'आम्ही संस्कृती जपतो - आम्ही परंपरा पाळतो' हे ब्रिदवाक्य असलेल्या वाडा तालुक्यातील शरद नगर मधे सर्व सण व उत्सव पारंपरीक पद्धतीने साजरे केले जातात. यावर्षीही रक्षाबंधन हा सणही मोठ्या उत्साहाने व आनंदाने सामुदायीकरित्या साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमामधे मुलांना मार्गदर्शन करताना शरद नगरचे संस्थापक शरद पाटील म्हणाले की, रक्षाबंधन सण हा भावा - बहिणींच्या नात्याचा पवित्र उत्सव आहे. हा उत्सव प्रत्येक नगरांमधे व गावांमधे सामुदायीकरित्या साजरा झाल्यास आणि लहान वयातच मुला - मुलींवर चांगले संस्कार केल्यास मुलांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि एक संस्कारक्षम पिढी नगरा - नगरांमधून उभी राहील.
ते पुढे म्हणाले की, शरद नगर मधील भावी पिढी ही सुसंस्कृत झाली पाहिजे. यासाठी सातत्याने विविध उपक्रम सामुदायीकरित्या राबवले जातात. त्यामधे नगरातील मुलांचा व महिलांचा सहभाग उल्लेखनीय असतो. सर्वजण एकत्र येऊन पारंपरीकरित्या मोठ्या आनंदाने प्रत्येक सण साजरा करतात व एक वेगळा संदेश देतात. आजही आपल्या नगरामधे राहणारी प्रत्येक मुलगी ही आपली बहिण आहे व मुलगा आपला भाऊ आहे, हा संदेश देऊन हा सण साजरा केला आहे.
रक्षाबंधनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव मंडळाचे *अध्यक्षा* भार्गवी गुणगुणे *उपाध्यक्ष* शुभ्रा कोल्हे, हादिया शेख, हर्षाली लोकरे *सरचिटणीस* सारंग पाटील, कौशल शिंदे *चिटणीस* स्मरण गांधी, साईशा पवार *कार्याध्यक्ष* दक्ष बढे, जयंत भोये, श्रेयस सूर्यवंशी *खजिनदार* आयुष यादव, रुद्र पवार, स्वरा कोल्हे *सहखजिनदार* प्रियांशू सोनी, नविश पाटील, श्रीथा उपाध्याय व *सदस्य* गौरव भोये, यथार्थ प्रसाद, दक्ष लोकरे, आरव निषाद, सौरभ निषाद यांच्यासह बाळ गणेश मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
COMMENTS