पालघर जिल्ह्यातील नामवंत लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्री. शरद यशवंत पाटील (रा. मशाल हाऊस, यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स, यशवंत नगर वाडा (M)8600001111) यांनी २००१ मधे वाडा शहरात बिल्डींग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला होता. आज हा व्यवसाय खुप मोठा झाला असुन जिल्ह्यातील प्रसिद्ध व विश्वासार्ह बिल्डरांमधे त्यांची गणना होते.
श्री. शरद पाटील यांनी २०११ मधे वाडा शहराबाहेरील ऐनशेत रोडवरील मोकळ्या माळरानावर 'शरद नगर' या नावाने बिल्डींग बांधकामास सुरुवात केली. आज या ठिकाणी एक सर्वांगसुंदर व सर्व सोयी - सुविधांनी सुसज्ज असे प्रतिष्ठीत नगर उभे राहिले आहे.
शरद नगरच्या प्रवेशद्वारावरच संघर्षमूर्ती स्व. लक्ष्मीबाई यशवंत पाटील यांचा पुतळा, नगरामधे प्रवेश करताच समोर लक्ष वेधून घेणारे स्वप्नपूर्ती गणपती बाप्पाचे मंदिर, मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान व गार्डन, ज्येष्ठांसाठी 'लक्ष्मीबाई पार्क' व नगरातील विविध कार्यक्रमांसाठी उभारलेला 'यशवंत रंगमंच', सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते, सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमीगत गटार व्यवस्था, स्वच्छतेसाठीचे नियोजन व २४ तास मुबलक पाण्याची केलेली सोय अशी अनेक वैशिष्ट्ये या नगराची सांगता येतील.
'शरद नगर' मधेच स्वप्नपूर्ती कॉम्प्लेक्स हा ७२ फ्लॅटचा सर्वांगसुंदर गृहप्रकल्प उभा राहत आहे. येथे मयुरेश्वर निवास (२० फ्लॅट), सिद्धेश्वर अपार्टमेंट (२० फ्लॅट) व विघ्नेश्वर सदन (३२ फ्लॅट) या तिन बिल्डींगचे काम सुरू असुन पहिल्या बिल्डिंगचा ताबा ग्राहकांना दिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या बिल्डींगचे काम सुरू आहे. फ्लॅटची बुकिंग सुरू असुन सर्वात कमी दर 'शरद नगर' मधेच आहेत. आजचा दर per sq. feet 2660 रु. असुन 15 लाख रुपयांमधे 1 BHK व 25 लाख रुपयांमधे 2 BHK फ्लॅट उपलब्ध आहेत. इतर कुठलेही छुपे चार्जेस घेतले जात नाहीत.
'शरद नगर' मधील स्वप्नपूर्ती कॉम्प्लेक्स हा ७२ फ्लॅटचा प्रकल्प अधिकृत रेरा मान्यता प्राप्त असून सर्व परवानग्या घेतलेला आहे. पहिल्या बिल्डींगची OC ( OCCUPANCY CERTIFICATE) वाडा नगरपंचायतीने दिली आहे. आज पर्यंत या नगरामधे १२५ फ्लॅटची विक्री झालेली असुन सर्व ग्राहक समाधानी आहेत.
या नगरातील फ्लॅटसाठी सर्व राष्ट्रीय बँकामार्फत कर्जाची सोय उपलब्ध आहे. व्यवहार पारदर्शकरित्याच केले जातात. व्यवसायाला सुरुवात केल्यापासुन आजपर्यंत एकाही रुपयाचा ब्लॅकने व्यवहार केलेला नाही, सर्व व्यवहार हे धनादेशाद्वारेच केले जातात. रोख रक्कम स्वीकारली जात नाही. त्यामुळे प्रतिष्ठीत व योग्य व्यक्तींनाच फ्लॅटची विक्री झालेली आहे. म्हणूनच विश्वासाने इतर ग्राहकही या नगरामधे फ्लॅट खरेदी करतात.
संस्थापक - बिल्डर श्री. शरद पाटील हे वाडा तालुक्यातील कायमचे रहिवासी असून त्यांचे मुळ गाव पिक, ता. वाडा हे आहे. त्यांचे वाडा शहरामधे कायमस्वरूपी वास्तव्य असुन ते सर्वांना सहज भेटतात. रोज शरद नगर मधे ते फेरफटका मारून गृहप्रकल्पावर स्वतः लक्ष ठेऊन असतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बिल्डींगचे काम सुरू होत असल्याने काम दर्जेदार होते. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होतात. म्हणूनच अल्पावधीतच 'शरद नगर' हे सर्वांच्याच विश्वासास पात्र ठरले आहे.
शरद नगर चे 'आम्ही संस्कृती जपतो - आम्ही परंपरा पाळतो' हे बोधवाक्य असुन या नगरामधे सर्व सण - उत्सव आनंदाने व उत्साहाने साजरे होतात. नगरातील सर्व प्रतिष्ठीत व चांगले नागरीक कौटुंबिक जिव्हाळ्याने एकमेकांशी वागतात. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील व इतर राज्यातील नागरीकही या नगरामधील कायमचे रहिवासी आहेत. मात्र कुठलाही वाद कधीही झालेला नाही. सर्वजण मिळुन - मिसळून राहतात. हे या नगराचे खास वैशिष्ट्य आहे. शरद नगरचे संस्थापक श्री. शरद पाटील हे दरवर्षी भाऊबीजेला नगरातील सर्व महिलांना भाऊबीज करतात. तर रक्षाबंधनला नगरातील महिला श्री. शरद पाटील यांना राखी बांधून उत्साह साजरा करतात.
वाडा शहरामधे कायमस्वरूपी वास्तव्य करू इच्छिणाऱ्या प्रतिष्ठीत कुटूंबीयांसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असलेला हा शहरातील एकमेव गृहप्रकल्प आहे. अधिक माहितीसाठी या शरद नगराचे संस्थापक - बिल्डर श्री. शरद पाटील यांच्याशी 8600001111 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
COMMENTS